शिवसेनेचे चारही इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी; मुख्यमंत्री शिंदेंसोबत महत्वाची बैठक | पुढारी

शिवसेनेचे चारही इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी; मुख्यमंत्री शिंदेंसोबत महत्वाची बैठक

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेले चारही उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, प्रवक्ते नरेश म्हस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि रवींद्र फाटक या चारही इच्छुक उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील निवासस्थानी बोलावून घेतले असून ठाणे लोकसभा मतदार संघाबाबत एक महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून मंगळवारी दिवसभर खलबते सुरु असून या मतदार संघासाठी उद्या चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. ठाणे लोकसभा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेले असल्याची जोरदार चर्चा असताना मंगळवारी भाजपने देखील नामनिर्देशन अर्ज घेतला असल्याने पुन्हा एकदा या मतदार संघाचा सस्पेन्स वाढला आहे.संध्याकाळी शिवसेनेच्या चारही इच्छुक उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावले असून ठाणे लोकसभा मतदार संघाबाबत महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button