Swedish Citizen In Assam : आसाममध्ये अटक झालेल्या तीन स्वीडिश नागरिकांना हद्दपार करण्याचे आदेश | पुढारी

Swedish Citizen In Assam : आसाममध्ये अटक झालेल्या तीन स्वीडिश नागरिकांना हद्दपार करण्याचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममध्ये तीन स्वीडिश नागरिकांना गुरुवारी परदेशी कायद्याच्या कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या स्विडिश नागरिकांमध्ये २ महिलांचा समावेश आहे. बुधवारी (दि. २६) एका धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या या नागरिकांविरोधात ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर न्यायालयाने त्यांच्याविरोधात हद्दपारीचे आदेश देखील दिले आहेत. (Swedish Citizen In Assam )

“पीस अँड हीलिंग प्रेयर फेस्टिव्हल” मध्ये सहभागी होण्याच्या बहाण्याने आसामच्या नाहरकटिया भागात हे पर्यटक आसाममध्ये आलेले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांना अटक झाल्यानंतर स्वीडनच्या भारतातील दूतावासाने अटक झालेल्या पर्यटकांना माफ करण्याविषयी विनंती केली. या चर्चेनंतर सत्र न्यायालयाने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना त्यांना फक्त हद्दपारीची शिक्षा सुनावण्याचा निर्णय देण्यात आला.

दिब्रुगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान आसामच्या नाहरकटिया भागातील अचबम घिनाई या क्रीडांगणावर “पीस अँड हीलिंग प्रेयर फेस्टिव्हल” आयोजित करण्यात आले होते. युनायटेड चर्च फेलोशिप आणि ब्लेस आसाम मिशन नेटवर्क (United Churches Fellowship and Bless Assam Mission Network) यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. धर्मांतर करण्याविषयी ते भाषण देत होते. याच कारणावरून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

बुधवारी तीघांना केली होती अटक

परदेशी कायद्याच्या कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी स्वीडनमधील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. सुओ मोटो केस त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आली. दिब्रुगढचे पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनूसार, संबंधित आरोपींना याबाबत दंड आकारला जाईल आणि त्यानंतर गुवाहाटी येथे पाठवले जाईल आणि त्यानंतर स्वीडनला पाठवले जाईल.

हेही वाचा

Back to top button