bigg boss merethi 3 : कोण योग्य आणि कोण अयोग्य ? | पुढारी

bigg boss merethi 3 : कोण योग्य आणि कोण अयोग्य ?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या  (bigg boss merethi 3 ) घरामध्ये काल सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवलेल्या “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे सदस्यांमध्ये बरेच वादविवाद, ओढाताण झाली. या कार्याच्या संचालिका मीनल आणि मीरामध्ये देखील बरेच वाद झाले.

आज सदस्यांमधील हे भांडण आणि धक्काबुक्की वेगळ्याच टोकाला जाणार आहे. कार्या दरम्यानचे राडे संपायचे नावचं घेत नाहीये असे दिसून येतं आहे. याच टास्कमुळे आज मीनल आणि विशालमध्ये देखील भांडण होणार आहे. कोण आहे योग्य आणि कोण आहे अयोग्य ? यावरून दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली आहे. दिवसेंदिवस घरातील समीकरण, नाती बदलताना दिसत आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगणेदेखील सध्या कठीण झाले आहे.

मीनल याबाबत बोलायला आणि तिचा मुद्दा मांडायला विशालकडे गेली असता विशालचा कुठेतरी मीनलच्या सांगण्यावर अजिबात विश्वास नसल्याचे दिसून आले. यावेळी मीनल विशालला म्हणाली, .जेव्हा पहिला टास्क होता तेव्हा तू जेवढे पण बॉक्स होते तेवढे उटललेस. यावेळी तू आणि बाकीचे सगळे ओरडत होते. यावेळी माझं म्हणण काय होतं की, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. झाला ना योग्य तो निर्णय..

त्यावर तृप्ती देसाई म्हणाल्या की, ‘आमचे चेपलेले बॉक्स का रिजेक्ट केले पहिल्या फेरीत ?’ त्यावर मीनल म्हणाली, ‘मी विशालशी बोलते आहे. मी दोन criteria ठेवले होते. जे पहिल्यांदा हाताला बॉक्स आले ते मी काढले. नंतर दुसऱ्याला हाताला आलेले बॉक्स काढले. मी जाणूनबूजून चेपलेले बॉक्स नाही काढले.’ त्यावर विशाल मीनलला म्हणाला ‘तूच काढले चेपलेले बॉक्स.’ त्यावर मीनल त्याला वारंवार सांगायचा प्रयत्न करत होती मी नाही काढले. यावर तुम्ही unfair खेळताय. माझ्यावर विश्वास नाही का तुमचा ? विशाल म्हणाला नाहीये.

बघूया पुढे टास्कमध्ये काय होते ? कोणाचं म्हणण खरं ठरतं ? मीनल तिचा मुद्दा पटवून देऊ शकेल ? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का?

Back to top button