

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्याविरूद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईचा सलामीवीर रोहित शर्मा अपयशी ठरला. आपल्या़ डावात तो अवघ्या आठ धावा करून तंबूत परतला. त्याला दिल्लीचा गोलंदाज खलील अहमदने होपकरवी झेलबाद केले. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करतान रोहित लवकर बाद झाला. यामुळे रोहितला सोशल मीडियावर जोरात ट्रोल केले जात आहे. सध्या रोहित शर्माला वडापाव म्हणून ट्रोल केले जात आहे.
रोहित त्याच्या फिटनेस आणि खेळीबाबत अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होत असतो. सोशल मीडियावर रोहितला वडा पाव या नावाने ट्रोल करण्यात येतं. लोकांचा समज असा आहे की, रोहित मुंबईचा आहे म्हणून त्याला वडा पाव नावाने ट्रोल केलं जात.
यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार राहिली आहे. लीगचे पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबईने यंदाच्या हंगामात एकूण 9 सामने खेळले आहेत. यात मुंबईला फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला. तर उर्वरित 6 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या सुमार कामगिरीमुळे लीगच्या गुणतालिकेत मुंबई सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्वाच्या जोरावर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनवणाऱ्या रोहितसाठी यंदाचा हंगाम खास नाही. स्पर्धेच्या सुरूवातीलाच रोहितला संघाच्या कर्णधार पदावरून हटवून हार्दिककडे संघाची कमान सोपवली. या निर्णयाविरूद्ध मुंबई आणि रोहितचे चाहते चांगलेच आक्रमक झाले होते. अशा परिस्थितीत ही रोहितने चांगली फलंदाजी करत आपला फॉर्म कायम ठेवला. काही सामन्यांचा अपवाद वगळता रोहितने आयपीएलच्या 17 व्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे.
यंदाच्या हंगामात रोहितने मुंबईसाठी 9 सामन्यात 311 धावांची खेळी केलीआहे. यामध्ये त्याने चेन्नईविरूद्धच्या सामन्यात नाबाद 105 धावांची शतकी खेळी करून मुंबईला विजयी करण्याचे प्रयत्न केले होते.
हेही वाचा :