सनी लिओनीचा केरळमधून फोटो व्हायरल, मल्याळम चित्रपटासाठी तयारी | पुढारी

सनी लिओनीचा केरळमधून फोटो व्हायरल, मल्याळम चित्रपटासाठी तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओनी सध्या तिच्या पुढील मल्याळम प्रोजेक्टचे शूटिंग करत असून एक लीक झालेल्या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या क्रूसह ती शूट करताना दिसतेय. सनी मल्याळम चित्रपट उद्योगात ठसा उमटवण्यास सज्ज आहे. या अभिनेत्रीने नुकतेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक पाम्पल्ली आणि चित्रपटाच्या टीमसोबत मुहूर्त पूजन केले होते.

अभिनेत्री सनी सध्या ‘Splitsvilla X5’ चा नवीन सीझन होस्ट करताना दिसत आहे. गेल्या वर्षी तिच्या आगामी ‘केनेडी’ चित्रपटाला त्याच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या प्रीमियरमध्ये दिसला.

अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाला जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळत असताना, चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित व्हायचा आहे. आता सनीकडे आगामी चित्रपट ‘कोटेशन गँग’ देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Back to top button