

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: सलग सात दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या ( Petrol – diesel ) दरात वाढ करण्यात आल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी अखेर आठव्या दिवशी इंधनाचे दर जैसे थे ठेवले आहेत तेल कंपन्यांनी सलग सहा दिवस पेट्रोल – डिझेल ( Petrol – diesel ) दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ केली होती. तर सातव्या दिवशी केवळ पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर असूनही ही दरवाढ करण्यात आली हे यातील विशेष आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ११०.०४ रुपयांवर स्थिर असून डिझेलचे दर ९८.४२ रुपयांवर स्थिर आहेत. मुंबईमध्ये हेच दर क्रमशः ११५.८५ आणि १०६.६२ रुपयांवर स्थिर आहेत.
तामिळनाडूतील चेन्नई आणि प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल क्रमशः १०६.६६ आणि ११०.५० रुपयावर तर डिझेल १०२.५९ आणि १०१.५६ रुपयांवर स्थिर आहे.
देशातील अन्य प्रमुख शहरांचा विचार केला तर हैदराबादमध्ये पेट्रोल ११४.४९ रुपये तर डिझेल १०७.४० रुपये, बंगळुरुमध्ये पेट्रोल ११३.९३ तर डिझेल १०४.५० रुपये, भोपाळमध्ये पेट्रोल ११८.८१ तर डिझेल १०७.९० रुपयांवर स्थिर आहे. याशिवाय गुवाहाटीमध्ये पेट्रोल १०६.०९ आणि डिझेल ९८.३६ तर लखनौमध्ये पेट्रोल १०६.९६ आणि डिझेल ९८.९१ रुपयांवर स्थिर आहेत.
हेही वाचलंत का?