

Anil Deshmukh यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणाचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सपशेल माघार घेत चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले होते त्याचे पुरावे नाहीत, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले असून त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्यावर खंडणीचा आरोप करत लेटरबॉम्ब टाकला होता. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला तर परमबीर सिंग यांना पसार व्हावे लागले. याच प्रकरणात सोमवारी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. मात्र, परमबीर सिंग यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगासमोर परमबीर सिंग हजर झाले नव्हते. देशमुख यांना या प्रकरणात ईडीने अटक केली. त्यानंतर लगेचच परमबीर सिंग यांनी चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले असून देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा परमबीर आपल्याकडे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
परमबीर यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांचा एकसदस्यीय चौकशी आयोग सरकारने नेमला आहे. त्यांच्यासमोर येण्यास टाळाटाळ करणाऱ्या परमबीर सिंग यांनी वकिलामार्फत आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आणखी कोणताही पुरावा माझ्याकडे नसल्याचे परमबीर यांनी नमूद केले आहे. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरुद्ध जे पत्र लिहिले आहे त्यापलीकडे कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे.
अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग हे कोर्टात हजर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ठाणे आणि मुंबई कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहेत. तसेच ते देशाबाहेर गेल्याचा आरोपही केला जातोय. मात्र, आज त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राने Anil Deshmukh यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने केलेल्या कारवाईवर काय परिणाम होणार याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :