भंडारा : घराची भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू | पुढारी

भंडारा : घराची भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसाने मांगली (दे) येथे घरांची भिंत अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. ईश्वर दौलत पुंडे (वय ६२ रा. मांगली) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शनिवारी सांयकाळी घडली.

तुमसर तालुक्यात शनिवारी सांयकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी घराच्या व्हरांड्यात बसलेल्या ईश्वर पुंडे यांच्या अंगावर घरालगतच्या मोतीलाल पुंडे यांच्या घराची भिंत कोसळली. ईश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची नोंद तुमसर पोलिसांत झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button