वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांचीही कानउघाडणी केली पाहिजे : उद्धव ठाकरे | पुढारी

वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांचीही कानउघाडणी केली पाहिजे : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क: विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सदस्यांनी नियम, शिस्त पाळणे आवश्यक आहे. याबाबत सभापतींनी कायम दक्ष राहले पाहिजे. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांचीही कानउघाडणी केली पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या उपसभापती कार्य अहवाल पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते आज (दि.21) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी ठाकरे यांनी नीलम गोर्‍हे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, नीलम गोर्‍हे सामान्य लोकांसाठी कायमपण कार्यरत राहिल्या आहेत. त्यांच्या सुखदु:खात त्या नेहमीच सहभागी असतात. सामान्य लोकांचे विशेषत: महिलांचे प्रश्न तडीस नेण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्यासारखी आहे. भंडाऱ्यातील प्रकरणाचा शिवसेनेने पाठपुरावा केला. यात नीलम गोर्‍हे  यांची भूमिका महत्त्वाची होती. दरम्यान, विधान परिषदेत आक्रमक झालेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांनी तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरात, अशा शब्दांत समज दिली होती. याबद्दल ठाकरे यांनी निलम गोर्‍हेंचे अभिनंदन केले.

महिलांच्या अत्याचाराच्या प्रश्नावर नुसता राजकीय गोंगाट करून फायदा नाही. याबाबत पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button