पुणे : पूर्ववैमन्‍स्‍यातून गोळीबार करून तरुणाचा खून | पुढारी

पुणे : पूर्ववैमन्‍स्‍यातून गोळीबार करून तरुणाचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात मोक्कातील आरोपीकडून गोळीबाराची घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तरुणाचा गोळीबार करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षय प्रकाश भिसे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुर्गामाता मंदीर एकनाथ पठारे वस्ती येथे ही घटना घडली आहे. भिसे हा कचऱ्याच्या गाडीवर काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पूर्वैमनस्यातून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसानी दिली. अक्षय चंदननगर परिसरात मंदिराजवळ थांबला होता. त्यावेळी त्याच्यावर दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दोन दिवसापूर्वी सिंहगड रस्त्यावर दहीहंडीच्या दिवशी एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना घडली असतानाच हा प्रकार घडला आहे.

Back to top button