सोलापूर : मंद्रूपच्या चौघांची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड | पुढारी

सोलापूर : मंद्रूपच्या चौघांची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तायक्वांदो अॅकॅडमीच्या मंद्रूप येथील चार खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली. सांगोला येथे जिल्हास्तरीय कॅडेट ज्युनिअर, क्यूरोगी व पूमसे तायक्वांदो स्पर्धा नुकत्याच झाल्या. त्यात या खेळाडूंनी यश मिळविले. या स्पर्धेत मंद्रूपच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात यश मिळविले.

यात कॅडेटमध्ये प्रतिभा राठोड, अथर्व उंबरजे व साक्षी राठोड यांनी सुवर्णपदक मिळविले. तर जूनियर गटात तनुजा पवार हिने सुवर्ण व महेक शेख हिने रौप्य पदक मिळविले. चारही पदक विजेत्या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या यशस्वी खेळाडूंना दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमी मंद्रूपचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंचे महाराष्ट्र तायक्वांदोचे अध्यक्ष अनिल जोडगे, महासचिव संदीप ओंबासे, सिवो गफार पठाण, सोलापूर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष आमदार शहाजीबापू पाटील, सचिव प्रमोद दौंडे, सहसचिव नेताजी पवार, खजिनदार गुरुलिंग गंगनहळ्ळी यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा 

सोलापूर : बेरोजगार तरुणांंना कंत्राटी शिक्षक म्हणून संधी द्या; शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून निघतोय सूर

सोलापूर : ‘प्रोत्साहन’ योजनेचा निर्णय अधांतरी

Solar Energy: सोलापूर जिल्ह्यासाठी २०३४ मेगावॅट सौर वीज निर्मितीचे उद्दीष्टे; १०१७० एकर जमिनीची गरज

Back to top button