पिंपरी : पालिकेच्या 137 अधिकारी-कर्मचारी बढतीचा मार्ग आता मोकळा | पुढारी

पिंपरी : पालिकेच्या 137 अधिकारी-कर्मचारी बढतीचा मार्ग आता मोकळा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील विविध पदांच्या रखडलेल्या पदांच्या अधिकारी व कर्मचारी पदोन्नती देण्याचा मार्ग खुला झाला आहे. महापालिकेच्या पदोन्नती समितीने सोमवारी (दि.16) एकूण विविध पदावरील 137 अधिकारी व कर्मचार्‍यांना बढती देण्यास मंजुरी दिली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समितीची बैठक झाली.

यामध्ये कार्यकारी अभियंता (विद्युत) 1, उपअभियंता (विद्युत) 1, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी 1, कार्यालय अधिक्षक 21, मुख्य लिपिक 90, सिस्टर इनचार्ज 14, वीजतंत्री 3, गटनिर्देशक 3, कनिष्ठ अभियंता (विद्युत) 2 आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 1 अशा एकूण 137 अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

या सर्व अधिकारी व कर्मचार्यांना पदोन्नतीसाठी समितीची मान्यता मिळाली आहे. यानंतर आयुक्तांच्या मान्यतेने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर त्या सर्वांची नियुक्ती केली जाईल, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

कोल्हापूर: वकील रणजीतसिंह घाटगे यांची सनद रद्द

Kolhapur Panchganga Flood : कोल्हापूरला महापुराचा धोका आणखी वाढण्याची चिन्हे!

चंद्रपूर : राजूरा येथील धमाल दांडीयाची आमदारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Back to top button