महात्मा फुले मार्केटमध्ये देहविक्री प्रकरणी २ महिलांसह दोघे संशयित ताब्यात | पुढारी

महात्मा फुले मार्केटमध्ये देहविक्री प्रकरणी २ महिलांसह दोघे संशयित ताब्यात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील महात्मा फुले मार्केटमध्ये एका बटाटा-कांदा व्यापारी त्याच्या कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा चालवत असल्याचे उघडकीस आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. यामध्ये कॉटन मार्केटमधील जोशी ट्रेडर्सचे मालक अजय जोशी यालाही अटक करण्यात आली. जय महादेव जोशी (४२, रा. प्लॉट नं. २१, रामकृष्णनगर, उमरेड रोड, दिघोरी) याचे फुले मार्केटमध्ये जोशी ट्रेडर्स नावाने  दुकान आहे. जोशी हा कांदे-बटाट्याचा एक व्यापारी आहे.

मात्र, त्याने या कार्यालयातच देहव्यापार सुरू केला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळताच शुक्रवारी (दि.3)  दुपारी जोशीच्या दुकानात छापा घातला. तेथे आरोपी दोन महिला देहव्यापार करत आहे असे निदर्शनास आले. काही दिवसांपासून कॉटन मार्केट परिसरात चार मुलींचे मृतदेह सापडल्याची अफवा होती. यानंतर दिवसभर गणेशपेठ पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबविले होते. दुसऱ्याच दिवशीच या सेक्स रॅकेटचा प्रकार उघडकीस आला. या दरम्यान आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल, १५ हजार ५०० रोकड आणि इतर साहित्य, असा एकूण २५ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकाराबद्दल गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रमुख कविता इसारकर, हवालदार प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, अश्वीन मांगे, लता गवई आणि शेषराव राऊत आदींनी केली.

हेही वाचा : 

Back to top button