तब्येत बिघडल्याने शरद पवारांचे उद्याचे नियोजित कार्यक्रम रद्द | पुढारी

तब्येत बिघडल्याने शरद पवारांचे उद्याचे नियोजित कार्यक्रम रद्द

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सभा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यांमुळे दगदग झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे शरद पवारांचे सोमवारचे (दि.6) नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवारांच्या तब्येतीमुळे सोमवार, दि. ६ मे रोजीचे सर्व नियोजित कार्यक्रम करण्यात रद्द करण्यात आले आहेत. लोकसभआ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या सोमवारी सभा आणि अनेक कार्यक्रम नियोजित होते. परंतु, तब्येत बिघडल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मंगळवारी या मतदार संघात होणार मतदान

मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहेॉ. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघामध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे.

Back to top button