पुणे : नोकरीच्या बहाण्याने अभियंत्याची फसवणूक | पुढारी

पुणे : नोकरीच्या बहाण्याने अभियंत्याची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेतील एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका आयटी अभियंत्याला सायबर चोरट्यांनी सव्वालाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी 51 वर्षीय अभियंत्याने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पृथ्वीराज सिंग, अविनाश मिश्रा, प्रीण गुप्ता या तिघांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आयटी अभियंता म्हणून काम करत होते. सध्या ते बेरोजगार आहेत. नोकरीच्या शोधात असताना, सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून आपल्या जाळ्यात खेचले. पुढे अमेरिकेतील एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून विविध प्रोसेसच्या नावाखाली वेळोवेळी 1 लाख 27 हजार रुपये ऑनलाइन भरून घेतले.
मात्र, त्यानंतर त्यांच्यासोबत सायबर चोरट्यांनी संपर्क करणे थांबवले. त्यांना कोणतीही नोकरी दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभियंत्याने अलंकार पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे करीत आहेत.

हेही वाचा

तिकडे धोंडे जेवणाला गेले अन् इकडे 30 तोळे सोने पळविले!

गावे बहरणार, हिरवाईने नटणार

नांदेड : चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटले

Back to top button