नांदेड : चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटले | पुढारी

नांदेड : चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटले

मुदखेड, पुढारी वृत्तसेवा : मुदखेड-नांदेड रस्त्यावर ईजळी लगत दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी मुदखेड येथील कदम ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या मुनीमास चाकूचा धाक दाखवून भर दिवसा लुटले. रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. ५)  दुपारी अंदाजे २:४५ वाजताचे दरम्यान घडली. याप्रकरणी गोविंद मुंगल यांनी मुदखेड पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रात्री ८:३० वाजता दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button