नागपूर : हमसफर,गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये 13 लाखांचा गांजा पकडला | पुढारी

नागपूर : हमसफर,गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये 13 लाखांचा गांजा पकडला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिला व दोन पुरुष अशा 5 आरोपींना 9 पोत्यांमध्ये खाकी पाकीट पॅकबंद असा 13 लाख 75,990 रुपये किमतीच्या 91 किलो गांज्यासह अटक करण्यात आली.

रेल्वे पोलीस फोर्स नागपूर यांनी स्थापन केलेल्या नार्कोस टीमने ही कारवाई केली. बल्लारशाह ते नागपूर दरम्यान ट्रेन क्रमांक 22705 तिरुपती जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेसमध्ये श्वान प्रिन्ससह कॉन्स्टेबल विकास कुमार आणि कॉन्स्टेबल नीरज यांनी कोच B-2 मधून हा 9 पोते गांजा पकडला. दिपाली बाला (वय 36 वर्षे, तुघलकाबाद, नवी दिल्ली), (मीरा सरकार, वय 42 वर्षे, हरिपूर, चिटका), नादिया (पश्चिम बंगाल), दीपाली दास, (वय ५० वर्षे, तुघलकाबाद, नवी दिल्ली ), अमलेश ब्रम्हा, तुघलकाबाद, (नवी दिल्ली) आणि विश्वजीत मंडल, (वय 39 वर्षे, रा. नटुनवीरपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सदर गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सिंग, लेडी कॉन्स्टेबल भावना चंद्रिकापुरे, कॉन्स्टेबल राकेश पाल, सहाय्यक उपनिरीक्षक मुकेश राठोड यांनी सदर गाडीची तपासणी केली व उपरोक्त संशयितास सामानासह ताब्यात घेतले. 40 पॅकेटचे वजन केल्यानंतर, एकूण 12,39,990 रुपयांचा 82.666 किलो गांजा सापडला.

दरम्यान,दुसऱ्या कारवाईत 12409 हजरत निजामुद्दीन गोडवाना एक्स्प्रेस अपंग कोचमध्ये सीटखाली 2 ट्रॉली बॅगमध्ये 1 लाख 25205 रूपयांचा 8.347 गांजा किलो जप्त केला. सदर साहित्य पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी नागपूरकडे सुपूर्द करण्यात आले.

Back to top button