पुणे : खेड तालुक्यात पावसाचा लपंडाव | पुढारी

पुणे : खेड तालुक्यात पावसाचा लपंडाव

वाडा : पुढारी वृत्तसेवा : जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटून गेला तरीही अद्यापही पावसाला सुरुवात झाली नाही. गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वार्‍यासह ढग दाटून येतात व क्षणार्धात गायब होत निरभ्र आकाश होत आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. त्यामुळे पावसाचा लपंडाव सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पावसाने जास्त दिवस दडी मारल्याने खरीप हंगाम लांबणार आहे. अद्यापि कोणतीच पेरणी झालेली नाही. जवळपास शेतकर्‍यांनी मान्सूनपूर्व मशागत उरकून ठेवली आहे. पावसाने आणखी ओढ दिली तर शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

दुसरीकडे नदी, नाले, ओढे, कोरडे पडले असून, त्यावर घेण्यात येणारी पिकेही घेता येत नसून, शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला आहे. गतवर्षी आजअखेर सोयाबीन पीक हे 20 ते 25 दिवसांचे झाले होते. परंतु अद्यापही सोयाबीनच्या पेरण्या करता आल्या नसल्याचे शेतकरी खंडु कदम यांनी सांगितले. लवकर पाऊस पडावा अशी आशा शेतकर्‍यांना लागली आहे.

हे ही वाचा : 

पुणे : वडगावशेरी परिसरात पाण्याचा खडखडाट ! भामा आसखेड योजनेची जलवाहिनी फुटल्याचा परिणाम

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांत होणार आठ एसटीपी प्रकल्प ; आराखडा तयार

 

Back to top button