धुळे : मतदारांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन | पुढारी

धुळे : मतदारांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

धुळे; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धुळे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष , तक्रार निवारण कक्ष, आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मतदारांच्या तक्रारी व मदतीकरिता ऑनलाईन पोर्टल सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

नागरिकांच्या मतदानासंदर्भातील तक्रारी किंवा अडचणींसंदर्भात खालीलप्रमाणे दुरध्वनी क्रमांक व ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष दुरध्वनी क्रमांक ०२५६२-२९८०३७, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष मोबाईल नंबर – ९३२२७६५८४८, जिल्हास्तरीय तक्रार निवारण दुरध्वनी नंबर ( हेल्पलाइन टोल फ्री नंबर) १९५०, राष्ट्रीय तक्रार सेवा पोर्टल https://ngsp.eci.gov.in नागरिकांनी त्यांच्या मतदार यादी संदर्भातील, आचारसंहिता व अन्य निवडणूक विषयक तक्रारींसाठी वरील क्रमांकांवर संपर्क करावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोयल यांनी केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button