नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी अॅड. नंदा पराते | पुढारी

नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी अॅड. नंदा पराते

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस, हलबा समाजाच्या नेत्या अॅड. नंदा पराते यांना शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे दृष्टीकोन व उद्दिष्ट पार पाडण्याची जबाबदारी देवून नागपूरात महिलांचे संघटन विकसित करून काँग्रेसला जास्तीत जास्त जनाधार प्राप्त होण्यासाठी ही नियुक्ती पोषक ठरेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहूल गांधी, राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्ष अलका लांबा व महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी अॅड. पराते यांची ही नियुक्ती केली.

हेही वाचा :

Back to top button