राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसरला  | पुढारी

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसरला 

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्ट रोजी अमृतसर, पंजाब येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने नागपूरमध्ये रविवारी (दि.५) रोजी बैठकीचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेज येथे कऱण्यात आले होते. ओबीसी हक्कांचा लढा सुरूच राहील, असा निर्धार ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला.

या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी, आणि ती अट रद्द होईपर्यंत क्रिमिलेयरची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी. या बरोबरच मंडळ आयोग आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करावा, या सर्व मागण्याकडे या महाअधिवेशनात लक्ष वेधले जाणार आहे.

प्रास्ताविक करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी आज पर्यंत झालेल्या अधिवेशनांची माहिती दिली, या बैठकीत समन्वयक डॉ.अशोक जिवतोडे, उपाध्यक्ष शेषराव येलेकर, कोषाध्यक्ष गुनेश्वर आरिकर, सहसचिव शरद वानखेडे, राज्य उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अध्यक्षा महिला महासंघ सुषमाताई भड, महाराष्ट्र महिला अध्यक्ष ज्योतीताई ढोकने, राष्ट्रीय युवा अध्यक्ष, सुभाष घाटे, ऋषभ राऊत, परमेश्वर राऊत, रुंदाताई ठाकरे, विदर्भ कार्याध्यक्ष शकील पटेल, राजू चौधरी, ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे , विनोद हजारे, शुभम वाघमारे निलेश खोडे, पराग वानखेडे, रुतीका डफ, नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष अनिलभाऊ, ओबीसी महासंघ, महिला महासंघ, युवा – युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ, वकील महासंघ तसेच सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र कार्यकारिणी, विदर्भ कार्यकारिणी, सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button