तुकोबारायांच्या वारीची तयारी, चार दिवसातच पंढरपूरकडे प्रस्थान | पुढारी

तुकोबारायांच्या वारीची तयारी, चार दिवसातच पंढरपूरकडे प्रस्थान

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा: संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दि. 20 रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवीत आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानची लगबग सुरू झाली आहे. वारीला केवळ चार दिवस बाकी असताना मोदींच्या कार्यक्रमाची तयारी करावी लागली. शीला मंदिराचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले.

गोपाळ गांधी विरोधकांचे राष्ट्रपतिपदाचे संयुक्त उमेदवार?

पण हा सोहळा एकमेवाद्वितीय ठरला. त्यामुळे वारीची तयारी होईलच, अशी अपेक्षा नितीन महाराज मोरे यांनी व्यक्त केली. वारीसाठी संस्थांचा गाथा पारायण सोहळा सुरू झाला आहे. सप्ताहाच्या निमित्ताने मंदिरात दररोज भजन कीर्तन गाथा पारायण होणार आहे. त्याच्या शेवटच्या दिवशी पालखी प्रस्थानाचा कार्यक्रम असतो.

Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारली

पालखी प्रस्थानाची तयारी आता वेग घेऊ लागली आहे. साडेतीनशे दिंड्यांचा पत्र व्यवहार पूर्ण झाला आहे. मंदिर विश्वस्त समितीने रथाची बैल जोडीची पाहणी करून ठेवली आहे. बाभूळकरांचा अश्व आणि प्रतापसिंह मोहिते पाटलांचा अश्व हे येणार आहेत. दिंड्यांना रथाच्या पुढे किती व रथाच्या मागे किती एक क्रमांक ठरलेले आहेत.

मागील दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा होऊ शकला नव्हता. यावर्षी सोहळा होत आहे, त्यामुळे सर्वांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. दुकानदारांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून मंदिरात सप्ताह बसला आहे. या सप्ताहाची सांगता पालखी प्रस्थानाच्या दिवशी होते.
– नितीन महाराज मोरे,
अध्यक्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान, देहू.

Back to top button