नाशिक : इंधन दरवाढीमुळे मशागतीलाही फटका | पुढारी

नाशिक : इंधन दरवाढीमुळे मशागतीलाही फटका

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा

दिवसेंदिवस इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीच्या खर्चातही वाढ होऊन एकरी 200 ते 700 रुपयापर्यंत वाढ झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे.

शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेती व्यवसाय संकटात आला आहे. बदलत्या काळानुसार बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. ट्रॅक्टरमुळे शेतीकामांना वेग येत असल्याने ट्रॅक्टर हे महत्त्वाचे साधन झाले आहे. शेती मशागतीत ट्रॅक्टरसह रोटाव्हेटर, नांगरणीचा वापर वाढला आहे. पूर्वी रोटाव्हेटरसाठी 2200 रुपये दर होता, तो आता 2500 झाला, तर बेळा भरणे 1000 मध्ये 1200 रुपयांची वाढ झाली आहे.

इंधन दरवाढीमुळे शेती मशागत परवडणारी नसल्याने बैलजोडीसुद्धा लाखोंच्या घरात पोहोचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ट्रॅक्टरद्वारे कामे लवकर होत असल्याने शेतकर्‍यांचा वेळ वाचत आहे. मशागतीच्या कामांना वेग वाढला असला, तरी इंधन दरवाढीमुळे मशागत करणे परवडत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असल्याने शेती मशागतीच्या रोटाव्हेटर, नांगरणी आदींमध्ये दरवाढ करण्यात आली.
– दीपक देसाई,
ट्रॅक्टर व्यावसायिक

हेही वाचा :

Back to top button