रायगड : पाचाड येथे मतदान करून परतणार्या ७५ वर्षीय मतदाराचा मृत्यू
रायगड : पुढारी वृत्तसेवा महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील मतदान केंद्रावर मतदान करुन रिक्षातून घरी परत जाताना (७५ वर्षीय) मतदार प्रकाश केशव चिंगटे यांचा अकस्मात मृत्यू झाला. या विषयी माहिती रायगड जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली.
सकाळी आठ वाजता प्रकाश चिंगटे हे मतदानाकरिता आले. तेव्हा त्यांना थकल्या सारखे वाटल्याने तेथील आशा सेविकांनी त्यांना पाणी देउन बसायला सांगीतले. थोड्या वेळाने त्यांना बरे वाटले. यानंतर त्यांनी मतदान करुन पुन्हा घरी निघाले. यावेळी ते रिक्षोने आपल्या किंजळोली वावेकर कोंड या गावी जाण्यास निघाले. मात्र दुदैवाने त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉ. देवमाने यांनी सांगीतले. सकाळी आठ वाजता उन नव्हते परिणमी हा मृत्यू उष्माघाताने झाला असे म्हणता येणार नाही असेही त्यांनी अखेरीस स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :