Dhule News | पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील ताहाराबाद मोसम नदीवरील पुल अवजड वाहतुकीसाठी बंद | पुढारी

Dhule News | पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील ताहाराबाद मोसम नदीवरील पुल अवजड वाहतुकीसाठी बंद

पिंपळनेर (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय महामार्ग 752 जी या महामार्गावरील ताहाराबाद गावाजवळील मोसम नदीवरील धोकादायक पुल अवजड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांनी आदेश काढला होता. या ब्रिटिशकालीन पुलाची अत्यंत दयनिय अवस्था झालेली असून पुल धोकादायक स्थितीत गेलेला असल्याने या पुलावर अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पिंपळनेर-सटाणा हा महामार्ग गुजरात राज्याला जोडणारा जवळचा व महत्वाचा मार्ग असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होती. सध्या पर्याय मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग असा सटाण्याकडून जातांना सटाणा-साक्री-पिंपळनेर किंवा ताहाराबाद साक्री ते पिंपळनेर पिंपळनेरकडून नामपुर, नामपुर ते साक्री,नामपुर ते साक्री,जातांना पिंपळनेर-साक्री,साक्री ते नामपूर,नामपूर सटाणा असा असून या पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी व एमएसआरडीसी विभागातर्फे करण्यात आले आहे. संबंधित विभागाकडून ज्या ठिकाणांना पर्यायी मार्ग सुरू होता. त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आले आहेत. परंतु वाहतूकदारांच्या हे बोर्ड लक्षात येत नसल्याने त्या ठिकाणी रस्त्याला बॅरिकेट करून त्यावर पर्याय मार्गाचा बोर्ड लावावा अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

नंदुरबार नाशिककडे जाणाऱ्या सर्व बसेस तसेच कार, लहान वाहने व दुचाकींसाठी हा रस्ता खुला राहणार असून ऊसाने भरलेले ट्रक, वाळूचा डंपर, कंटेनर, गॅस सिलेंडर टॅंकर तसेच जड वाहनांना या पुलावरून जाण्यास पूर्ण बंदी करण्यात आली आहे. मात्र वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार बायपास हा जुना ताहाराबाद गावातून जाणाऱ्या रस्त्यावरून करून दिल्यास वाहनधारकांचा फेरा वाचू शकतो. व्हाया नामपुर साक्री व साक्री-पिंपळनेर हा लांब पल्ल्याचा रस्ता असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा –

Back to top button