पुणे : सुप्यानंतर आता मुरुममध्ये दिसले रान गवे

पुणे : सुप्यानंतर आता मुरुममध्ये दिसले रान गवे
Published on
Updated on

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा

मुरूम (दि. बारामती) येथे सोमवारी (दि. ४) रात्री साडेसातच्या दरम्यान ऊसाच्या शेतात चार रान गव्यांचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मात्र मंगळवारी (दि. ५) सकाळी शेतात व आजूबाजूला पाहणी केली असता हे गवे स्थानिक शेतकऱ्यांना दिसले नाहीत. गेल्या १५ दिवसांपूर्वीच सुपे परीसरात रानगवे दिसले होते. यानंतर पुन्हा मुरुम येथे रान गव्यांचे दर्शन झाले. वनविभागानेही या वृत्ताला दुजोरा दिला असून, हे प्राणी एका ठिकाणी थांबत नसल्याचे सांगितले.

मुरुम येथील सिध्देश्वर कुंजीर व मयूर कुंजीर यांच्या निरा नदी शेजारी असलेल्या शेतात गव्यांचे दर्शन झाले. मंगळवारी सकाळी मात्र गवे शेतातून बाहेर पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेजारील निरा नदीतून ते पलीकडील खामगाव परीसरात गेले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शांत प्राणी असल्याने नागरीकांना मात्र त्याचा फारसा त्रास होत नाही; मात्र उसासह अन्य शेतमालाचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news