

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत कार कंटेनरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे.
ही दुर्घटना सोमवार (दि.4) पहाटे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. भीषण अपघातात कारमधील दोन व्यक्ती मृत्यू पावल्या व एक जण जखमी आहे.
राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन (44, रा. कळवा, जि. ठाणे) व औतार गुरूदयाल सिंह सेहरा (50 रा. कोपरी, ठाणे) अशी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत, तर नितेशकुमार जैन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामशेत येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या कंटेनर क्र. (जीजे 12 एझेड 7004) वरील चालकाचे कामशेत खिंडीतील वळण रस्त्यावर नियंत्रण सुटले आणि कंटेनर उलटून पुण्याकडे जाणार्या मार्गावर गेला.
त्याचवेळी त्याचवेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली इको कार क्र.(एमएच 46 पी 3634) ही रस्त्यात उलटलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात कारमध्ये पुढे बसलेले राजेंद्रकुमार जैन व औतार सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. तर नितेशकुमार जैन हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून कारमधील मृतांना व जखमीस बाहेर काढले व जखमी व्यक्तीस कामशेत येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
घटनेचा तपास हवालदार समीर शेख, पोलिस नाईक अनील हिप्परकर, सुनील गवारी, सचिन निंबाळकर करत आहेत. अपघातामुळे पुणे- मुंबई महामार्गावर पहाटे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.