बैचैन आहात? गाढ झोप हवीय, बेडरुममध्ये ठेवू नका ‘ही’ गोष्ट | पुढारी

बैचैन आहात? गाढ झोप हवीय, बेडरुममध्ये ठेवू नका ‘ही’ गोष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तुम्हाला गाढ झोप हवीय?  कोरोना महामारीचा काळ आता ओसरतोय. मात्र मागील दीड वर्षात आरोग्‍यासह आर्थिक समस्‍यांनाही बहुतांश जणांना तोंड द्‍यावे लागले. तसेच कोरोना काळात निरोगी राहण्‍याबरोबरच प्रतिकारशक्‍ती वाढविणे गरजेचे आहे.

निरोगी आरोग्‍याचा पाया असणार्‍या झोप ही सर्वांनाच हवीहवीशी असते.

मात्र मागील काही दिवसांमध्‍ये जगण्‍यातील अनिश्‍चतेमुळे झोपे संदर्भात तक्रारीत वाढ झाल्‍याचे दिसत आहे.

रात्री अचानक जाग येणे, पुरेशी झोप न होणे, झोपच न लागणे अशा आरोग्‍याच्‍या तक्रारींमध्‍ये आता वाढ होत आहे.

नैसर्गिक झोप ही शारीरिक आरोग्‍याबरोबरच मानसिक आरोग्‍यही सदृढ ठेवते. शांत झोप हवी असेल तरी जाणून घेऊ या काही टिप्‍स…

आहारात करा केळाचा वापर

तुम्‍हाला अनिद्रेचा त्रास होत असेल तर रात्रीच्‍या आहारात तुम्‍ही केळाचा वापर करा. केळामधील मॅग्‍नेशियम आणि पोटॅशियम यासह फॉलिक अॅसिड,
व्‍हिटॅमिन ए, बी, बी६, लोह कॅल्‍शियम यासारखे घटक असतात. केळाच्‍या सेवनामुळे शरीर सदृढ होण्‍याबरोबरच शांत झोप येण्‍यासही मदत होते.

झोपेपूर्वी करा दीर्घ श्‍वसन

शांत झोप हे एका वरदानासारख असतं.

अलिकडे बदलेल्‍या जीवनशैलीमुळे आणि आपल्‍या जगण्‍यातील इलेक्‍ट्रॉनिक डिव्‍हायसचा वापर वाढल्‍याने अनिद्राचा विकार हा आता कॉमन झाला आहे.

मात्र तुम्‍ही दीर्घश्‍वसन केले तर शांत झोप येण्‍यास मदत होते.

दीर्घश्‍वसन करताना मनातल्‍या मनात आकडे मोजत ४ सेंकद श्‍वास घ्‍या, सात सेंकद श्‍वास रोखा आणि तोंडाने हळूवार ८ सेंकद श्‍वास सोडा.

ही क्रिया किमान चारवेळा करा. या क्रियेमुळे तुमचे मन शांत होण्‍यास मदत होते. शांत मन हाच झोपेचा पाया आहे.

झोपेपूर्वी आवडते संगीत किंवा ऑडिओबुकचा आनंद घ्‍या

दिवसभराच्‍या धावपळ आणि वाढत्‍या तणावामुळे शांत झोप ही अलिकडे स्‍वप्‍नवतच वाटते. मात्र दिवसभरातील तणाव कमी करण्‍यासाठी झोपेपूर्वी तुम्‍ही तुमचे आवडे संगीत ऐकू शकता. तसेच तुमच्‍या आवडीचे ऑडिओबुकचा वापर झोपेपूर्वीकरुन मन सकारात्‍मक करु शकता. यामुळे तुमच्‍या मनावरील तणाव कमी होण्‍यास मदत होते.

झोपेपूर्वी डायरी लिहा

तुम्‍ही चिंताग्रस्‍त असाल तर झोपेचा काळ कमी होतो. सहाजिकच त्‍याचा आरोग्‍यावर अत्‍यंत प्रतिकुल असा परिणाम होतो.

म्‍हणूनच म्‍हटले जाते चिंता नको चिंतन करा; पण मनात सुरु असणार्‍या विचारांचे वादळ कसे थांबणार, हा प्रश्‍न सर्वांचाच मनात असतो.

यावर मात करण्‍यासाठी तुम्‍ही झोपेपूर्वी मनात असणारे विचार, चिंता आणि उद्‍याच्‍या दिवसाचे नियोजन डायरीमध्‍ये लिहू शकता.

या लिखाणामुळे तुमच्‍या मनावरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होतो, असे मानसशास्‍त्रज्ञांनी केलेल्‍या विविध संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

त्‍यामुळे तुम्‍ही झोपेसाठी तळमळत असाल तर डायरी लिहण्‍याचा प्रयोग

निश्‍चित करुन पहा, शांत झोप येण्‍यास मदत होईल.

बेडरुमच्‍या भिंतीवर लावू नका घड्याळ

बेडरुमध्‍ये केवळ अलार्म घड्याळ असू द्‍या. भिंतीवर घड्याळ लावू नका.

कारण तुम्‍हाला झोप येत नसेल तर तुम्‍ही विनाकारण घड्याळकडे बघत बसता.

वेळ निघून जातोय झोप येत नाही, ही चिंता सुरु होते. यामुळे तुमच्‍या मनावरील ताण वाढतो.

याचा नकारात्‍मक परिणाम तुमच्‍या झोपेवर होतो. त्‍यामुळे बेडरुमच्‍या भिंतीवर घड्याळ नको, ही टिप्‍स वापरुन पहा.

हात-पायांना कोमट पाण्‍याने मालीश करा

झोपण्‍यापूर्वी हात-पायांना कोमट पाण्‍योन मालीश केले शरीर आणि मनाला आराम मिळतो. तसेच डोक्‍याला तेलाने मालीश केल्‍यासही शारीरिक व मानसिक तणाव कमी होण्‍यास मदत होते.

रात्रीच्‍या आहारातून मसालेदार पदार्थ टाळा

उत्तम आरोग्‍यासाठी रात्रीचा आहार हा हलकाच घ्‍यावा. झोपण्‍यापूर्वी दोन तासांपूर्वी रात्रीचे जेवण घ्‍यावे. तसेच रात्रीचा आहारात मसालेदार पदार्थांसह तेलकट व मिरचीचे पदार्थ टाळावेत.

झोपेची जागाही तितकीच महत्त्‍वाची

शांत झोप येण्‍यासाठी खोलीत कमी प्रकाश फायदेशीर ठरतो. कमी प्रकाश असेल तर शांत झोप येण्‍यास मदत होते. तसेच झोपताना सैल कपड्यांचा वापर करा. यामुळे शांत झोपबरोबरच शरीर निरोगी राहण्‍यासही मदत होते.

व्‍यायाम अत्‍यावश्‍यकच

शरीराला शांत झोप हवी असेल आपल्‍या जीवनशैलीत व्‍यायामाचा समावेश करावा. निरोगी शरीरासाठी सकाळी चालणे हे उत्तमच तसेच अन्‍य कोणत्‍याही प्रकारच्‍या व्‍यायामामुळे शरीर निरोगी राहते. शरीर निरोगी असेल तर झोपही नैसर्गिकरित्‍या चांगले लागते, हा निसर्गाचा नियमच आहे.

झोपेची निश्‍चित वेळ ठरवा

झोपेचे घड्याळ आपल्‍या मनात असते. तुम्‍ही जशी सवय लावाल त्‍याप्रमाणेच झोपची वेळ ठरते. त्‍यामुळे यासाठी निश्‍चित वेळ ठरावा. नियमित त्‍याचे पालन करा. तसेच किमान सात ते आठ तास झोप ही निरोगी शरीरासाठी अत्‍यावश्‍यक असेत. तसेच कितीवेळ झोपला यापेक्षा किती तास तुम्‍हाला गाढ झोप आली यावरही आपले आरोग्‍य ठरते.

झोपेपूर्वी एक तास आधी मोबाईल व लॅपटॉपपासून लांब रहा

मोबाईल फोन ‘स्‍मार्ट’ झाल्‍यापासून जगण्‍यातील प्रत्‍येक क्षणात तो तुमच्‍याबरोबरच असतो. सकाळी झोपतून जागे झाल्‍यापासून पुन्‍हा झोपेपर्यंत. मात्र याचा दुष्‍परिणाम आपल्‍या आरोग्‍यावर होतो. त्‍यामुळे झोपेपूर्वी एक तास आधी मोबाईल फोन आणि लॅपटॉपपासून लांब रहा. यामुळे तुमची गाढ झोप होईल आणि उद्‍याचा दिवस तुम्‍ही अधिक उर्जेने कार्यरत राहू शकता.

हेही वाचलं का ?  

Back to top button