

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ईशान्य भारतामध्ये दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या कुकी नॅशनल फ्रंट चा म्हाेरक्या मंगकोहलम किपजेन याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. कुकी नॅशनल फ्रंट हा प्रामुख्याने मणिपूरमध्ये देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेला आहे.
किपजेन हा कुकी फ्रंटचा स्वयंघोषित कमांडर इन चीफ होता. त्याच्याविरोधात अपहरण आणि खंडणीचे असंख्य गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
डेव्हिड किपजेन या नावानेही ओळखल्या जाणार्या या कथित कमांडरला दिल्लीतील द्वारका भागात अटक करण्यात आली असल्याचे पोलिस उपायुक्त प्रमोदसिंग कुशवाह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कुकी फ्रंट हा प्रामुख्याने मणिपूरमध्ये देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेला आहे.
हेही वाचलं का ?