IPL : विराट कोहली याने आरसीबी कर्णधारपद सोडण्याचा का घेतला निर्णय? | पुढारी

IPL : विराट कोहली याने आरसीबी कर्णधारपद सोडण्याचा का घेतला निर्णय?

दुबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याने सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेनंतर संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

नुकतेच कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचीही घोषणा केली होती. यंदाची आयपीएल स्पर्धा ही माझी संघाचा कर्णधार म्हणून माझी शेवटची स्पर्धा आहे. पण त्यानंतरही मी आरसीबीचा खेळाडू म्हणून मी खेळत राहणार आहे.

माझ्या शेवटच्या आयपीएल सामन्यापर्यंत मी आरसीबीसाठी खेळत राहीन. आजवर माझ्यावर ठेवलेल्या विश्वास आणि मला दिलेल्या पाठिंब्याबाबत मी सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त करतो, असे विराट कोहली याने म्हटले आहे.

विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबी संघाकडून खेळत आहे. पण कोहलीच्या नेतृत्वात आरसीबी संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवता आलेले नाही.

दरम्यान, विराट कोहलीने टी-20 मध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे कर्णधारपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर रोहित शर्माचे नाव आहे.

यापूर्वीदेखील रोहितला टी-20 कर्णधारपद देण्यात यावे, असे अनेक विशेषज्ञाने सांगितले होते. आकड्यांमध्येदेखील रोहित विराटपेक्षा सरस आहे. टी-20 क्रिकेटमध्ये रोहितची विजयी टक्केवारी 78.94 अशी आहे.

आयपीएलच्या 2013 च्या सत्रात मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या मध्येच रिकी पाँटिंगकडून कर्णधारपद काढून रोहित शर्माला दिले आणि रोहितने संघाला पहिल्यांदा आयपीएल जेतेपद मिळवून दिले. यानंतर रोहितने कधीही मागे वळून पाहिले नाही.

रोहितने आजवर 5 आयपीएल जेतेपद मिळवले आहे. रोहितने मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 ला जेतेपद मिळवून दिले होते.

कोहलीकडून निराशा

2012 मध्ये विराटला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद देण्यात आले. मात्र, नऊ वर्षांत त्याला एकदाही जेतेपद मिळवता आले नाही. 2016 मध्ये कोहलीचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र, त्यांना जेतेपद मिळवण्यात अपयश आले. विराट कोहलीला 2017 मध्ये निर्धारित षटकांच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

आतापर्यंत त्याने 45 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 27 लढतीत विजय मिळवले. तर, 14 सामन्यांत त्याला पराभूत व्हावे लागले. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही आणि दोन सामने टाय राहिले. कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, 2019 चा एकदिवसीय विश्वचषक उपांत्य सामना आणि 2021 जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : स्त्रीच्या कर्तुत्वाला सन्मान देणारी अमृता फडणवीसांची गणेश वंदना | Exclusive Amruta Fadanvis

 

Back to top button