Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, २९ एप्रिल ते ५ मे २०२४ | पुढारी

Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, २९ एप्रिल ते ५ मे २०२४

चिराग दारूवाला :


Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, 29 एप्रिल ते 5 मे २०२४ चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : या आठवड्यात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणामुळे तरी तुमचे ध्येय साध्य करण्यात अडथळे निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. यामुळे थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. अशी सूचना श्रीगणेश देतात. प्रेमसंबंधातील लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. तुमचे जोडीदाराबरोबर नाते मधूर होईल. या आठवड्यात गृहिणी घरातील सुखसुविधांबाबत विचार करतील. परिचित लोकांची भेट भविष्यासाटी लाभदायक ठरेल.

वृषभ : तुम्‍ही या आठवड्यात कामातून विश्रांती घेण्यास उत्सुक असाल. पर्यटनाचा बेत आखाल. घराच्‍या नूतनीकरणाचाही विचार कराल. जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात, मात्र जोडीदाराच्‍या मतांचा आदर करणे तुमच्‍यासाठी चांगले ठरेल, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कोणत्याही गोष्टीत यशस्वी होण्यासाठी तुम्‍हाला स्‍वत:ला पुढाकार घ्‍यावा लागेल. शारीरिक वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसतील. एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च केलेल्‍या पैशातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन : आरोग्याशी संबंधित कोणताही सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आहारावर नियंत्रण ठेवत निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. कामाच्या ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे, तुमच्या हट्टी स्वभावामुळे समस्या उद्भवू शकतात, असे श्रीगणेश सांगतात. प्रेमसंबंधांसाठी काळ थोडा संमिश्र असेल. तुमच्या जोडीदाराच्‍या मुद्द्याचा आदर करा.

कर्क : श्रीगणेश म्हणतात की, या आठवड्यात कुटुंबातील सदस्‍याच्‍या यशाबद्दल अभिमान वाटेल. कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. तुम्ही आरोग्याबाबत अधिक जागरूक होऊ शकता. नियमित व्यायामाचा विचार कराल. एक छोटीशी सुरुवात मोठ्या फायद्यात बदलू शकते. प्रेमसंबंधांसाठी काळ अनुकूल आहे. प्रवासाला जाण्याचे बेत आहेत. परदेश प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणी भेट देण्याची संधी मिळू शकते.

सिंह : या आ‍ठवड्यात कोणतेही काम वेळेवर पूर्ण करण्याचा आत्मविश्वास असल्‍याशिवाय कोणतेही काम हातात घेऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. प्रेम संबंधांवर लक्ष केंद्रित करा आणि जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. कोणतीही वैयक्तिक समस्या त्वरित सोडवणे आवश्यक आहे. कोणत्‍याही कामात घाई करणे टाळा. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येवर घरगुती उपायांनी फायदा होईल. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिस्थितीत कठोर परिश्रम करत रहावे.

कन्या : हा आठवडा तुमच्यासाठी व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या चांगला राहील. नशिबामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. या आठवड्यात प्रेमसंबंधांसाठी काळ संमिश्र राहील. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे; अन्यथा तुमच्या हट्टी स्वभावामुळे समस्या उद्भवू शकतात.

तूळ : हा आठवडा करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. कामाच्या ठिकाणी काही परिस्थितींमुळे तुमच्या प्रयत्नांना विलंब होण्याची शक्यता आहे. पुढील त्रास टाळण्यासाठी कोणतीही महत्त्वाची जबाबदारी घेण्यापूर्वी सुरुवातीपासून विचार करा. कोणतेही महत्त्वाचे काम चुकणार नाही, याबाबत सतर्क रहा, अशी सूचना श्रीगणेश करतात. घरात बदल करण्याच्या तुमच्या इच्छेशी इतर लोक असहमत असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा संमिश्र असेल.

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, शिक्षण क्षेत्राशी संबंधितांना या आठवड्यात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे.आरोग्याशी संबंधित प्रयत्नांना यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्‍याने पैशाशी संबंधित समस्या उद्भवणार नाही. तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करेल. प्रेमसंबंधांसाठी काळ अनुकूल आहे. आठवड्याच्‍या शेवटी तुम्‍हाला समस्‍येवर उपाय सापडेल. कामातील यशामुळे तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल.

धनु : श्रीगणेश म्‍हणतात की, शेअर बाजाराशी संबंधित लोकांनी या आठवड्यात हुशारीने पैसे गुंतवावेत, कारण या आठवड्यात पैशाशी संबंधित बाबींमध्ये नशीब साथ देणे थोडे कठीण जाईल. आरोग्याच्या बाबतीत दिवस समाधानकारक राहील, असा प्रयत्न करा. या आठवड्यात परिस्‍थितीचा सामना करा. कामावर तुम्ही ज्याची अपेक्षा करत आहात ते लवकरच घडण्याची शक्यता आहे. अभ्यासासाठी वेळ चांगला जाईल. चांगल्या कामगिरीमुळे यशाची शक्यता वाढत आहे.

मकर : या आठवड्यात नोकरीत तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. कोणत्याही रोगाला पर्यायी औषधाचा फायदा होईल. अभ्यासात तुम्ही केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील आणि तुमची उद्दिष्टे गाठण्याच्या जवळ आणतील. सुट्टीत कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत कराल. नवीन नोकरीत स्थलांतर होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी अनुकूल परिणामाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा आनंदाचा काळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. पैशाशी संबंधित बाबींसाठी काळ चांगला जाणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात तुम्हाला कुटुंब आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवताना चांगले वाटेल. आर्थिक बाबतीत कोणीतरी मदत करेल. खाण्याच्या सवयी सुधारणे तुमच्या हितदायक असेल. प्रेम संबंधांबाबत हा आठवडा समाधानकारक राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या स्वभावाने आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करू शकाल. कार्यालयीन कामकाजात रागावर नियंत्रण ठेवा. अभ्यासातील परिणाम अपेक्षेप्रमाणे नसू शकतात. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मेहनत करा.

मीन : हा आठवडा शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी काळ चांगला आहे. अभ्यासाबाबत निश्चित दिशा स्वीकारणे ही तुमच्यासाठी योग्य वाटचाल ठमरेल. जोडीदारासोबतच्या नात्यात काही चढउतार येऊ शकतात, त्यामुळे थोडे सावध राहा. उत्साहात किंवा चेष्टेमध्ये बोलणे तुमचे प्रियजन किंवा मित्र वाईटरित्या घेऊ शकतात, सावधगिरी बाळगा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. वरिष्ठांच्या अनिश्चिततेमुळे या आठवड्यात तुम्ही गोंधळात पडू शकता.

Back to top button