‘बोर्डात टॉप केले नसतं तर बरं झालं असतं’ : युपीतील प्राची ट्रोलिंगमुळे निराश | पुढारी

'बोर्डात टॉप केले नसतं तर बरं झालं असतं' : युपीतील प्राची ट्रोलिंगमुळे निराश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमध्‍ये दहावी बोर्डमध्‍ये ९८.५० टक्‍के गुणांसह प्राची निगम टॉपर आली. मात्र उच्च गुण मिळवूनही चेहऱ्यावरील केसांमुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे दहावीच्‍या परीक्षेत तील मिळालेल्‍या यशापेक्षाही तिच्‍या दिसण्‍यावर चर्चा झाली आहे. यामुळे प्राची व्‍यथित झाली आहे. मी दहावीच्‍या परीक्षेत टॉन केले नसतं करत बरं झालं असतं. मी अशा प्रकारे सोशल मीडिया चेहरा बनले नसते. ‘बीबीसी न्‍यूज हिंदी’शी बोलताना तिने आपल्‍या कर्तृत्‍वापेक्षा दिसण्‍यामुळे सोशल मीडियात ट्रेंड झाल्‍याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

संपूर्ण प्रकाराने साहजिकच मला वाईट वाटलं: प्राची निगम

प्राची निगमने म्‍हटलं आहे की, ” मी बोर्डात प्रथम आले नसते तर बरं झालं असतं. कारण माझ्या चेहऱ्यावरील केसांसाठी मला अशा ट्रोलचा सामना करावा लागला नसता. मला माझ्‍या चेहर्‍यावरुन ट्रोल केले जात असताना काही जण माझ्‍या बचावासाठी समोर आले. मुलींच्या चेहऱ्यावरचे असे केस अनेकदा हार्मोनल बदलांमुळे होतात, अशी माहिती देत त्‍यांनी ट्रोल करणार्‍यांना सुनावले. या संपूर्ण प्रकाराने साहजिकच मला वाईट वाटते; परंतु लोक (सोशल मीडियावर) त्यांना काय वाटते ते लिहितात आणि याबद्दल काहीही केले जाऊ शकत नाही.”

प्राचीचे पालकही व्‍यथित;पण मुलीला दिला ट्रोल्‍सकडे दुर्लक्ष करण्‍याचा सल्‍ला

प्राचीच्‍या आई ममता निगम यांनी म्‍हटलं आहे की, मी माझ्या मुलीला ट्रोल्सकडे लक्ष न देण्यास सांगितले. विशेष म्‍हणजे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी काही दिवसांनी माझ्या मुलीला समर्थन दिले.” प्राचीचे वडील चंद्र प्रकाश निगम म्हणाले की, ” ट्रोलिंगमुळे आपलं कुटुंब नाराज असले तरी त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. समाजात सर्व प्रकारचे लोक असतात. आम्हाला स्वाभाविकपणे वाईट वाटले; परंतु त्याच वेळी आमच्या मुलीने जास्तीत जास्त गुण मिळवल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे,”

केवळ प्राचीचे कुटुंबीयच नाही तर तिच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि मित्रमंडळीही तिला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी ट्रोलिंगला दुर्दैवी म्हटले. “आम्हाला पहिल्यापासूनच प्राचीचे नाव टॉपर्समध्ये असेल, असा विश्‍वास होता. तिने दहावीच्‍या परीक्षेत ९८.५० टक्‍के गुण मिळवून तिने संपूर्ण उत्तर प्रदेशचा गौरव केला आहे,” असेही प्राचीच्‍या शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button