अपहृत बालकाची सुटका; तामीळनाडू एक्सप्रेसमधील प्रकार | पुढारी

अपहृत बालकाची सुटका; तामीळनाडू एक्सप्रेसमधील प्रकार

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : तामीळनाडू एक्सप्रेसमधून अपहृत बालकाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. ट्रेन नंबर २६२१ तमिळनाडू एकस्प्रेस मध्ये कोच नं डीएल-१, सिट नं ९ व १० वर चेन्नई येथून एका बालकास अपहरण करून घेऊन जात असल्याची माहिती १९ रोजी रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्‍या आधारे पोलिसांनी जलद हालचाली करून अपहृत बालकाची सुखरूप सुटका केली.

या विषयी माहिती मिळताच पोलीसांनी फलाट क्र. १ वर जाऊन ट्रेनमध्ये शोधाशोध केली. यावेळी अपहृत मुलासह आरोपी मोनु गरीबदास केवट (वय २६) व शिब्बु गुड्डु केवट (वय २२) हे दोघे सापडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता, मुलाच्या पालकांना न विचारता व कुणालाही काही न सांगता गावी जात असल्याचे त्‍यांनी कबूल केले.

ही माहिती नियंत्रण कक्ष तसेच तामिळनाडू राज्यातील संबंधित पोलीस ठाण्यास देण्यात आली. तामीळनाडू पोलिस येईपर्यत संबंधित मुलाला विद्यार्थी गृहात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम . राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिन्दे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या नेतृत्वाखाली जीआरपी नागपूर येथील पोलिस उपनिरीक्षक विजय तायवाडे व ओमप्रकाश भलावी आदींनी केली.

पहा व्हिडिओ : स्त्रीच्या कर्तुत्वाला सन्मान देणारी अमृता फडणवीसांची गणेश वंदना

Back to top button