धारूर : सोनिमोहात अज्ञात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू | पुढारी

धारूर : सोनिमोहात अज्ञात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालूक्यातील सोनिमोहा येथे दराडे वस्तीवर ६ वर्षाच्या बालकावर अज्ञात हिंस्त्र वन्यप्राण्याने गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी शेतात घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा सोमवारी दुर्देवी मृत्यू झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार सोनिमोहा येथे गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमिनीत खेळत असलेला बालक यशराज दत्तात्रय दराडे याच्या नरड्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा अज्ञात वन्यप्राण्यांने केल्या आढळून आल्या.

जखमी झाल्यावर बालकास अबांजोगाई येथील स्वामी रामांनद तिर्थ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेमुळे सोनिमोहा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा कोणता वन्यप्राणी आहे, याचा शोध वनविभागाने लवकारात लवकर घ्यावा, अशी मागणी सोनीमोहा येथील नागरिकांमधून केली जात आहे.

याबाबत वनविभागाने लवकरात लवकर घटनास्थळी धाव घेऊन शोध घेण्याची गरज आहे. कारण गावातील अन्य नागरिकांवर हल्ला होण्याची भीती नागरिकांत निर्माण झाली असून प्रशासनाने आणि लोक प्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची मागणी सोनिमोहा ग्रामस्थ करत आहेत. वन विभागाचे अधिकारी उत्तम चीटके यांच्याशी संपर्क केला असता आम्हाला याची कसलीच माहिती मिळाली नाही आणि आत्ताच तुमच्याकडूनच कळाले कार्यालयातील अधिकाऱ्याला ताबडतोब घटनेच्या ठिकाणी पाठवतो, असे सांगण्यात आले आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button