

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशभरात सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा ( Covid vaccination ) कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गापासून बालकांचा बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण अभियानाची व्याप्ती वाढवली आहे. मुलांनी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी उत्साहाने सहभाग नोंदवला.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, दिल्ली, पश्चिम बंगाल, चंदीगढ, जम्मू-काश्मीर, केरळ सह इतर अनेक राज्यांमध्ये लहान मुलांचे लसीकरण सुरूवात करण्यात आली.
५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या नाेंदणीला जानेवारी महिन्यापासून ( Covid vaccination ) सुरूवात करण्यात आली. सोमवारी दुपारपर्यंत जवळपास चार लाख मुलांनी डोस घेतल्याची माहिती समोर आली आहे. कोव्हिन पोर्टलवर नोंदणी केल्यासह थेट केंद्रावर जावून देखील मुले लस घेवू शकतील. मिळालेल्या माहितीनूसार आतापर्यंत ७.५६ मुलांनी लसीकरणासाठी कोव्हिन अँपवर नोंदणी केली आहे. सर्वांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस लावण्यात येणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचा अतिरिक्त डोस पाठवण्यात आले आहेत.
२५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारीपासून लसीकरणाची घोषणा केली होती. मुलांसह आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी १० जानेवारीपासून प्रिकॉशन डोस लावण्यात येणार आहे. भारतात 'कॉर्बेव्हॅक्स' तसेच 'कोव्होव्हॅक्स' लसीला मंजुरी देण्यात आली आहे. या लसींना बूस्टर वा प्रिकॉशन डोस च्या रूपात वापर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप केंद्र सरकारने कोरोनाची प्रिकॉशन डोज ची परवानगी दिलेली नाही. देशातील ९०% पात्र लोकसंख्येला आतापर्यंत पहिला डोस, तर ६५% लोकसंख्येला दुसरा डोस लावण्यात आला आहे. ११ हून अधिक राज्यांमध्ये १००% पात्र लोकसंख्येला पहिला डोस लावण्यात आल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
देशातील संपूर्ण लसीकरणाची स्थिती
श्रेणी संपूर्ण लसीकरण
१) आरोग्य कर्मचारी ९७,१८,२५९
२) फ्रंटलाईन वर्कर्स १,६९,०९,७६२
३) १८ ते ४४ वयोगट ३३,६४,२०,५४८
४) ४५ ते ५९ वयोगट १५,१७,३९,९९०
५) ६० वर्षांहून अधिक ९,५८,२१,८०८
हेही वाचलं का?