पुढारी ऑनलाईन डेस्क : 'एक दुजे के लिए' या चित्रपटातील प्रेमकथा सर्वांनाच माहिती आहे. बऱ्याचदा आपण चित्रपटांमधून पाहिलंय की, हिरोचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह पाहताच हिरोईनचादेखील मृत्यू होतो, अशा कथा आपल्या मनोरंजनासाठी दाखविण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात अशीच एक घटना नागोरमध्ये घडली आहे. पतीला श्वास घेण्यास त्रास झाला, त्यात पतीचा मृत्यू झाला… पतीचा मृतदेह घरी आणला… तो मृतदेह पाहताच पत्नीने जागीच जीव सोडला.
ही घटना आहे राजस्थानच्या नागोरमध्ये घडली आहे. नियमितपणे शनिदेव मंदिरात पूजा-पाठ करणारे ७८ वर्षीय राणाराम सेन यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यांना रविवारी पहाटे जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ८ वाजता त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला.
पतीचा मृतदेह समोर पाहताच रामराणांची ७५ वर्षीय पत्नी भंवरीदेवी यांनी जागीच जीव सोडला. एकाचवेळी पती-पत्नीचा झालेला मृत्यू पाहून परिसरात दोघांच्या अतूट प्रेमाची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. या दाम्पत्याला मुलगा नाही, त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या मुलींनीच केले. त्यांच्या मुलींची लग्नं झालेली आहे.
या आगळ्या-वेगळ्या प्रेमाचं अतूट नातं असणाऱ्या दाम्पत्याची अंत्ययात्रा गावकऱ्यांनी वाजत-गाजत काढली. त्या अंत्ययात्रेत संपूर्ण गावं सहभागी झालेले होते. मूळचे रुण गावाचे निवासी असणारे राणाराम सेन यांचं लग्न ५८ वर्षांपूर्वी भंवरीदेवी यांच्यासोबत झालेले होते. दोघांमध्ये खूप प्रेम होते. दोघे एकमेकांशिवाय कुठेच जाऊ शकत नव्हते. त्यांचे प्रेम अमर आहे, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली. शेवटी ही आगळीवेगळी प्रेम कथा वाचून 'हम बने तुम बने, एक दुजे के लिए', हे गाणं आपल्याला नक्कीच आठवतं.
हेही वाचलं का?