प्रेयसीला भेटण्याचा डाव अंगलट; गुजरातचा अट्टल गुन्हेगार सापडला पोलीसांच्या जाळ्यात !

प्रेयसीला भेटण्याचा डाव अंगलट; गुजरातचा अट्टल गुन्हेगार सापडला पोलीसांच्या जाळ्यात !
Published on
Updated on

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

गुजरातमधील अट्टल गुन्हेगाराला जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याच्या जंगलातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सुरत सिटी याच्या ताब्यात दिले आहे.

गुजरात राज्यातील डिंडोली पोलीस स्टेशन (गुजरात) रजि नं. ३८२९/२०२१ भा.द.वि. ३८६, ५०४, ५०६ (२), १४३,१४४, १४८, १४९, GUJCTOC Act ३(१)(१), ३(१)(२), ३(२), ३(४) या  गुन्ह्यातील आरोपी कैलास आधार पाटील (वय २८ रा. महादेव नगर सोसायटी, नगम डिंडोली, सुरत) हा जळगाव जिल्ह्यात लपून बसला असल्याची गुप्त माहिती स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे कैलासचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमंलदार सफो अशोक महाजन, पोह संदीप रमेश पाटील, पोना प्रविण मांडोळे, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील असे पथक नेमुन त्यांना आदेश देवून टीम तयार करण्यात आली होती.

सदरचा आरोपी कैलास पाटील हा पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर अधिक तपास केला असता कैलास पाटील हा रात्री अमळनेर येथे त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. यानंतर मंगरुळ – पारोळा रोडवर एलसीबीच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व पथकातील कर्मचारी व स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी गुजरात राज्य यांनी संयुक्तरीत्या सापळा रचून त्यास अटक केली. यानंतर कैलासला पुढील कारवाईसाठी स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी यांच्या ताब्यात देण्यात आले.

दाखल असलेले गुन्हे

आरोपी कैलास आधार पाटील हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुजरात राज्यात माहिम पो.स्टे. गुरनं. ४७४/१३ भादवि ३७९, ३४, लिंबायत पो.स्टे. गुरनं. १२०/१३ भादवि ३०२, लिंबायत पो.स्टे. गुरनं. १५५/१६ भादवि ३०२, लिंबायत पो.स्टे. गुरनं. २३८१/२१ भादवि ३०२, लिंबायत पो.स्टे. गुरनं. ४०४०/२१ भादवि १८८, लिंबायत पो.स्टे. गुरनं. १६९१/२१ गुजरात पोलीस कायदा कलम १३५, लिंबायत पो.स्टे. गुरनं. २६८/१७ भादवि ३२३, सचिन पो.स्टे. गुरनं. १७५/१० भादवि ३३२, सचिन पो.स्टे. गुरनं. १९०/१९ भादवि ३२३ आणि डिंडोली पो.स्टे. गुरनं. १३६६/२१ गुजरात पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news