सत्तेसाठी तिन्ही गटांनी फुंकले रणशिंग | पुढारी

सत्तेसाठी तिन्ही गटांनी फुंकले रणशिंग

वैराग : पुढारी वृत्तसेवा : नव्याने स्थापन झाले ल्या वैराग नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. येणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीत आपल्याच गटाची सत्ता नगरपंचायतीवर यावी यासाठी वैरागमधील तिन्ही प्रमुख गटांनी बैठका घेऊन रणशिंग फुंकले आहे. यात जय जगदंबा परिवाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

वैराग नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवार निवड चाचपणी व विचारविनिमय करण्यासाठी माजी मंत्री शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी सोपल मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. हा गट शिवसेनेचा असला तरी यात स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होण्याची शक्यता कमी असल्याने वरिष्ठांना बोलून महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यात येईल, असे दिलीप सोपल यांनी सांगितले.

महाविकास आघाडी झाली तरी आणि नाही झाली तरी निवडून येण्यासाठी लढणार, असे यावेळी अरुण सावंत यांनी सांगितले. या बैठकीला अरुण कापसे, माजी जि.प. सदस्या तेजस्विनी मुरोड, रावसाहेब खेंदाड, देवा दिंडोरी, संतोष गणेचारी, बाळासाहेब पवार, हमीद चौधरी, विकास गवळी, किशोर देशमुख, मारुती जिरंगे, अशोक वरदाने, अमरराजे निंबाळकर, नंदकुमार पांढरमिसे, रामभाऊ थोरात, दत्तात्रय काळे, समीर शेख उपस्थित होते.

अपक्ष आमदार व भाजपचे सहयोगी आ. राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि.प. सदस्य संतोष निंबाळकर यांनी चंद्रकांत निंबाळकर संपर्क कार्यालय याठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी राऊत म्हणाले, नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीमध्ये आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे.

विकासकामांसाठी आगामीकाळात नगरपंचायतीला कसल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे आणि विजय मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले. संतोष निंबाळकर म्हणाले, आमदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवणार असून सर्वांनी आपल्यातील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेऊन एकदिलाने, एक विचाराने निवडणुकीसाठी सहकार्य करून आपलीच सत्ता नगरपंचायतीवर यावी यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी संतोष निंबाळकर, बार्शीचे नगराध्यक्ष अ‍ॅड. आसिफ तांबोळी, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, माजी जि.प. सदस्य मकरंद निंबाळकर, नगरसेवक विलास रेणके, अशोक सावळे, मोहन घोडके, भारत पंके, आप्पासाहेब खेंदाड, श्रीशैल्य भालशंकर, आर.पी.आय. शहराध्यक्ष दीपक लोंढे, मेजर जगन्नाथ आदमाने, दिलीप खेंदाड, राजेंद्र निंबाळकर, शिवाजी सुळे, नाना धायगुडे, नूर बागवान, बबलू बागवान, बजरंग सातपुते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यामंदिर हायस्कूल येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बोलताना निरंजन भूमकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नगरपंचायतीवर येण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यावेळी श्रीहरी मोहिते, मौलाना अब्बास कादरी, प्रशांत भालशंकर, राजकुमार पौळ, भारत सोनवणे, भारत ठोंबरे, राजाभाऊ खेंदाड, चांद शेख, परशुराम पांढरमिसे, हरिश्चंद्र देवकर, दिलीप गुंजाळ, किशोर ताटे, गुलाब शेख, शिवाजी हजारे, नजीर शेख, हनुमंत पांढरमिसे, भारत रेड्डी, देवा पौळ, इंद्रजित पौळ, बाळासाहेब भूमकर, मृणाल भूमकर, मल्हारी ठोंबरे, आलम शेख, खंडेराय घोडके उपस्थित होते.

शिक्षणमहर्षी कै. बाळासाहेब कोरके यांनी स्थापन केलेल्या जय जगदंबा परिवाराची धुरा सध्या
डॉ. कपिल कोरके यांच्या खांद्यावर आहे. जगदंबा परिवाराची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर व भाजपचे राजेंद्र मिरगणे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. भाजपपुरस्कृत राजेंद्र राऊत यांचा स्थानिक असलेला संतोष निंबाळकर गट हा ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे निश्चित आहे.

राष्ट्रवादीचा निरंजन भूमकर गट ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, माजी मंत्री शिवसेना नेते दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण सावंत यांचा गट आघाडी करून लढणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिन्ही गटांच्या बैठका पार पडल्या असून, आता हळूहळू निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.

Back to top button