Heart Surgery : मृत्यूच्या दारातून परतला ‘हा’ बॉडीबिल्डर, आता सांगतोय थंड पाणी का पिऊ नये? | पुढारी

Heart Surgery : मृत्यूच्या दारातून परतला 'हा' बॉडीबिल्डर, आता सांगतोय थंड पाणी का पिऊ नये?

पुढारी ऑनलाईन डेस्क : पेशाने बॉडीबिल्डर असलेल्या व्यक्तीला थंड पाणी पिल्यामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर जावं लागलं होतं. नुकतीच त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता तो  लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागरुकता निर्माण करत आहे. त्या बॉडीबिल्डरच नाव आहे फ्रँकलिन अर्बेना. तो अमेरिकेतील ह्यूस्टन शहरातील रहिवासी आहे. (Heart Surgery)

Heart Surgery : बॉडीबिल्डरची हृदय शस्त्रक्रिया

अमेरिका या देशातील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन या शहरामधील एक प्रसिद्ध बॉडीबिल्डर फ्रँकलिन अर्बेना  लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागरुकता निर्माण करत आहे. जनजागृती करत असताना तो आपल्या १५ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे फिटनेस जपत असताना झालेल्या चुकांबद्दल माहिती सांगण्याच काम करत आहे. फ्रँकलिन सांगताो की एकदा वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पिल्याने त्याचा जीव जाता-जाता वाचला. मृत्यूच्या दाढेतून तो वैद्यकीय उपचाराने परत आला. फिटनेसबद्दल तो लोकांना सतत सावध करत असतो.

नेमकं काय घडलं होतं?

माहितीनुसार, गेल्या १५ वर्षांत, फ्रँकलिनला वारंवार हॉस्पिटलमध्ये जावे लागले आहे. या दरम्यान तो २० पेक्षा जास्त वेळा हॉस्पिटलमध्ये गेला आहे. फ्रँकलिन १८ वर्षांचा असताना अचानक बेशुद्ध पडला. त्याच्यानंतर त्याला त्याच्या आरोग्याची परिस्थिती समजली. त्याच्या वैद्यकीय तपासणीने मूल्यांकन केले. तेव्हा लक्षात आले की त्याला हृदयाच्या शस्त्रक्रियेची गरज भासत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना फ्रँकलिन एरिबियाना म्हणाला की, ” मी थंड पाणी पीत असताना माझ्या छातीत लक्षणीय अशी धडधड जाणवली. मी यापूर्वी असे कधीही  अनुभवले नव्हते. यानंतर फ्रँकलिन अचानक बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

प्रकृती का बिघडली?

जेव्हा फ्रँकलिन थंड पाणी प्याला, तेव्हा त्याच्या मानेच्या मागच्या बाजूला असलेल्या व्हॅगस मज्जातंतूच्या उत्तेजनामुळे ही स्थिती उद्भवली. व्हॅगस मज्जातंतू प्रत्यक्षात मेंदूपासून छातीपर्यंत पसरते आणि ती सहसा हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचे काम करते. फ्रँकलिनवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, अशा स्थितीत लोकांना सामान्यतः थकवा, छातीत अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. डॉक्टर म्हणतात की व्यायाम करताना लोकांनी त्यांच्या लक्षणांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दुसरीकडे, या अवस्थेचा सामना करणारे फ्रँकलिनही लोकांमध्ये याबाबत जनजागृती करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button