देशात गरीब, श्रीमंतांना वेगळा न्याय का? पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणी राहुल गांधींचा सवाल | पुढारी

देशात गरीब, श्रीमंतांना वेगळा न्याय का? पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणी राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना देशात गरीब आणि श्रीमंत लोकांना वेगवेगळा न्याय आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. सोशल मीडियावरील एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मंगळवारी (दि.२१) निशाणा साधला. पंतप्रधान दोन ‘हिंदुस्थान’ निर्माण करत आहेत, जिथे न्याय देखील संपत्तीवर अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी यावेळी दिली.

एखाद्या बस चालकाकडून अथवा ओला, उबेर चालकाकडून अपघात घडल्यास त्याला दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली जाते. मात्र, एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने दारू पिऊन दोन लोकांना चिरडले तर त्याला निबंध लिहायला सांगितला जातो, हा अजब न्याय आहे. बस चालक, ओला, उबेर चालकांनाही अशीच सौम्य शिक्षा का दिली जात नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. गरीब असो की श्रीमंत सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी व्हिडिओ पोस्टमध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button