Health Diary: नव्या वर्षाचा संकल्प करूया, निरोगी आरोग्यासाठी ‘आरोग्य डायरी’ बनवूया | पुढारी

Health Diary: नव्या वर्षाचा संकल्प करूया, निरोगी आरोग्यासाठी 'आरोग्य डायरी' बनवूया

किर्ती कदम

अनेक गृहिणीना, नोकरदार महिलांना दैनंदिन जमा-खर्चासाठी डायरी वापरण्याची सवय असते. त्यामध्ये रोजचे खर्चही नियमितपणे लिहिले जातात. काही जणी व्यक्तिगत रोजच्या कामांचीही डायरी लिहितात. मात्र, आरोग्य डायरी लिहिणाऱ्यांची संख्या विरळच ! तुम्ही म्हणाल, आता हा काय प्रकार आहे. (Health Diary)

आरोग्य डायरीमध्ये तुम्ही आरोग्याचा हिशेब नोंदवू शकता. यामध्ये तुम्ही कभी आजारी पडला होता, कोणता आजार झाला होता, आपल्या कुटुंबात कोणते आजार आनुवंशिक आहेत. तुम्हाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना कुठल्या औषधांची अॅलीर्जी आहे. खाण्यातील कोणता पदार्थ तुम्ही पचवू शकत नाही, ऋतू बदलल्यानंतर होणारे आजार, त्यावरील औषधे यांसारख्या सर्व गोष्टी त्यामध्ये नोंद करून ठेवाव्यात. (Health Diary)

वीस वर्षांचे वय असणाऱ्यांनी आपल्या आरोग्य डायरीत लहानपणी आणि किशोरवयात दिलेल्या लसींबाबत लिहावे, ३० वर्षांनंतर आपल्या आहारात केलेल्या बदलांबद्दल लिहावे, तसेच वयानुसार होणाऱ्या त्रासाबद्दलही लिहावे चाळिशीत प्रवेश केल्यानंतर आपल्या सर्व जारोग्य तपासणीचा तपशील लिहीत राहावा, मागच्या वेळी कोणत्या तपासण्या केल्या होत्या, कोणती औषधे घेतली होती, याची माहिती अवश्य लिहावी, बरेचजण आजारानंतर डॉक्टरांनी दिलेले प्रिस्किप्शन टाकून देतात, ती टाकण्याऐवजी फाईलमध्ये व्यवस्थित ठेवली, तर पुढच्यावेळी उपचार करणे अधिक सोपे जाते. हेल्थ डायरीमुळे आपल्या आरोग्याची एक झलकच एका क्षणात समोर उभी राहील. (Health Diary)

रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना बरेचदा यापूर्वी केव्हा रक्तदाब तपासला होता, असे विचारले तर ते चटकन सांगू शकत नाहीत. हेल्थ  डायरीमुळे या त्रासाबाबत सविस्तर सांगता येते. हेल्थ डायरीमध्ये प्रत्येक नोंद वैद्यकीय शब्दावलीत केली पाहिजे, असे मुळीच नाही, आपल्या साध्या भाषेतही लिहिता येईल. त्याचबरोबर यामध्ये आपल्या दैनंदिनीची नोंदही करता येईल, सकाळी उठण्याची वेळ, नाश्ता, जेवण, त्यातील पदार्थाचा समावेश, रात्री झोपण्याची वेळ, व्यायाम, फिरतीचा जॉब असल्यास त्याबाबतचा तपशील असे सरासरी एकदाच नोंदवता येईल. त्यामुळे डॉक्टरांना आपली दिनचर्या योग्य की अयोग्य हे पटकन आणि अधिक सविस्तरपणे समजू शकते. चला तर मग, आपणही संकल्प करूया, अशी आरोग्य डाबरी लिहिण्याचा. (Health Diary)

हेही वाचा:

Back to top button