धुळे जिल्‍हा बँक निवडणूक : दोन जागा महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या ताब्यात | पुढारी

धुळे जिल्‍हा बँक निवडणूक : दोन जागा महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या ताब्यात

धुळे ; पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा बँकेच्या 4 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात दोन जागा महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या ताब्यात गेल्या असून, दोन जागांवर सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात गेल्या आहेत.

धुळे जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी आज पारस मंगल कार्यालयात मतमोजणी होते आहे. या मतमोजणीत पहिल्या 4 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल तर्फे हर्षवर्धन दहिते व राजेंद्र देसले यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल मधून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व संदीप वळवी यांचा विजय झाला आहे.

या निवडणुकीदरम्यान सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व भाजपचे आमदार अमरिषभाई पटेल व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे करीत आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याचं स्वप्न भंग करणार्‍या जिल्हा परिषदेचे सदस्य पोपटराव सोनवणे यांच्या मुलाचा अक्षय पोपटराव सोनवणे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

या पूर्वी निवडणुकीत सात जागा या बिनविरोध झाल्या आहेत .त्यापैकी सहा जागांवर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल विजयी असून एका जागेवर शिवसेना विजयी झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button