Delhi pollution : दिल्‍लीत वायू प्रदूषणाचा कहर, ट्रक वाहतुकीला शुक्रवारपर्यंत 'नो एंट्री' | पुढारी

Delhi pollution : दिल्‍लीत वायू प्रदूषणाचा कहर, ट्रक वाहतुकीला शुक्रवारपर्यंत 'नो एंट्री'

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

दिल्‍ली आणि नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर) मध्‍ये वायू प्रदूषणाचा कहर कायम आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्‍यासाठी विविध उपाययाेजना केल्‍या जात आहेत. ( Delhi pollution) पुढील आदेश येईपर्यंत सरकारी व खासगी शाळ बंदच राहणार आहेत. तसेच अत्‍यावश्‍यक सेवेतील ट्रक वगळता अन्‍य सर्व ट्रकच्‍या प्रवेशवर बंदी घालण्‍यात आली असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

Delhi air pollution control : दहावी, बारावी परीक्षा सुरु राहणार

दिल्‍ली आणि एनसीआरमधील वाढत्‍या वायू प्रदूषणामुळे वायू गुणवत्ता व्‍यवस्‍थापन आयोगाने ( सीएक्‍यूएम ) रविवारी नवीन आदेश जारी केले. यानुसार पुढील आदेशांपर्यंत सर्व शाळा बंद राहतील. मात्र दहावी आणि बारावीच्‍या परीक्षा सुरु राहणार आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी सीएक़्‍यूएमने शाळांसह २१ नोव्‍हेंबरपर्यंत ट्रक वाहतुकीला प्रतिबंध घातले होते. आता २६ नोव्‍हेंबरपर्यंत हा आदेश कायम ठेवण्‍यात आला आहे. हे निर्बंध केवळ अनाश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा करणार्‍या ट्रकवर लागू असेल.

सरकारी व खासगी कार्यालयातील कर्मचार्‍यांनीही वर्क फॉर्म होम करावे, अशी सूचना ‘सीएक्‍यूएम’ने केली होती. दिल्‍ली मेट्रो, रेल्‍वे, संरक्षण क्षेत्र, विमानतळ वगळता सर्व प्रकारच्‍या बांधकामावरील बंदी कायम ठेवण्‍यात आली आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button