Nawab Malik : यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?, नवाब मलिकांकडून आणखी एक गौप्यस्फोट | पुढारी

Nawab Malik : यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?, नवाब मलिकांकडून आणखी एक गौप्यस्फोट

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. आता नवाब मलिक यांनी आणखी नवीन एक फोटो ट्विटवर शेअर केलाय. हा फोटो समीर वानखेडे यांचा असून तो त्यांच्या निकाह वेळचा असल्याचे दिसते. यासोबत मलिक यांनी वानखेडेंच्या निकाहनाम्याचा फोटोदेखील पोस्ट केला आहे.

”निकाहनाम्यावर साक्षीदाराच्या उपस्थितीत हस्ताक्षर करत असलेले समीर दाऊद वानखेडे…!” असे मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
”कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?”, असे आणखी एक ट्विट करत मलिक (Nawab Malik) यांनी सवाल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु आहे.

याआधी नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक-खान यांनी लग्नपत्रिकाच ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. माझे नाव ज्ञानदेव वानखेडे. मी मुस्लिम धर्म स्वीकारलेला नाही. मी अनुसूचित जाती मधीलच आहे, असे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे प्रसारमाध्यमांपुढे सांगत असले तरी, समीर यांच्या लग्नपत्रिकेवर त्यांचे नाव ‘दाऊद’ असे धडधडीत छापण्यात आले आहे. याबाबतची लग्नपत्रिकाच निलोफर मलिक-खान यांनी ट्विट केली होती.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा ७ डिसेंबर २००६ रोजी अंधेरी येथील समर्थ नगरच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये शबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला आहे. समीर हे दाऊद आणि जहिदा वानखेडे यांचे सुपुत्र असल्याचा उल्लेख या निकाहनाम्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे नाव दाऊदच असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button