शिक्षक भरती नियमावलीनुसारच करावी! | पुढारी

शिक्षक भरती नियमावलीनुसारच करावी!

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल अंतर्गत दिलेल्या नियमावलीनुसार करण्यात यावी, ही भरती मेरिटनुसार करण्यात यावी. शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता तसेच सर्व कागदपत्र यात जात प्रवर्ग, समांतर आरक्षण ही सर्व परीक्षेच्या आवेदनपत्र करण्याच्या शेवटच्या दिवसाची 12 फेब्रुवारी गाह्य धरण्यात यावी, अशी मागणी ‘युवाशाही’च्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी कडू, जयश्री शिंदे, तुषार देशमुख, केतन धोटे आदींनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण विभागाचे सचिव आदींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2010 पासून बंद असलेली शिक्षक भरती 2017 पासून सुरू झाली. यापूर्वी शिक्षक भरती करताना गैरप्रकार होत असे, अनियमितता असायची, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हायचे. परिणामी,विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळावा, ह्या हेतूने शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलची निर्मिती झाली. त्यात मेरीटनुसार शिक्षक घेण्यासाठी अभियोग्यता व बुद्धीमता चाचणी घेण्याचे आयोजन केले. 2017 मध्ये शिक्षक भरतीमध्ये नियमावली तयार केली.त्यामध्ये शैक्षणिक अर्हता आणि व्यवसायिक अर्हता, आरक्षण, कोणत्या आधारे भरती करायची, रिक्त पदांच्या जाहीराती याच पूर्ण माहिती दिलेली आहे.

असे असतानाही देखील जाणीवपूर्वक शिक्षण विभाग आणि अधिकारी वर्ग याकडे सध्या दुर्लक्ष करत आहेत. आता याची पुनरावृत्ती 2022-23 च्या शिक्षक भरतीमध्ये होताना दिसत आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पहिली झाल्यानंतर दुसरी परीक्षा सहा महिन्यानंतर व्हायला पाहिजे पण 2017 नंतर ही परीक्षा 2022 ला जाहीर झाली. फेब्रुवारी 2022 ला ही परीक्षा होणार होती. परंतु टीईटी घोटाळ्यामुळे ही परीक्षा पुढे गेली. ही 2022-23 ची टेट परीक्षेचे परीक्षा परिषदेने आयबीपीएस मार्फत आयोजन केले.
त्यानंतर परीक्षेचे नोटीफिकेशन डिसेंबर 2022 पूर्वी जाहीर करण्याचे सांगितले होते. परंतु शालेय शिक्षण विभागाच्या संथ गतीमुळे हे नोटीफिेकेशन 31 जानेवारी 2023 ला निघाले.

7 फेब्रुवारी 2023 ला परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रक देवून व्यवसायिक अर्हता बदल केला. यात सीटीएटी अ‍ॅपेअरला संधी देण्याचे कारण काय असेल, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण याच भरतीमधून आधी टीईटी बोगस उमेदवार बाहेर होते. पण त्यावर कोणतीही कारवाई न करता उलट सीटीईटी अ‍ॅपेअर असलेल्या उमेदवारांना अभय देण्याचा निर्णय घेतल्यामुळे टीईटी बोगस उमेदवारांना ह्या भरतीत संधी मिळेल, ह्या हेतुने हा नियम डावलण्यात आलेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी शिक्षक भरती नियमाने व पारदर्शक पद्धतीने करावी, अशी मागणी युवाशाही असाोसिएशनने केली आहे

हेही वाचा

पुणे शहरातील केवळ 245 होर्डिंगचे नूतनीकरण

पुणे शहरातील केवळ 245 होर्डिंगचे नूतनीकरण

ग्रामीण विद्यार्थ्यांना हक्काची प्लेसमेंट

Back to top button