जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी केल्या 8 मोटर सायकल हस्तगत  | पुढारी

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी केल्या 8 मोटर सायकल हस्तगत 

जळगाव: पुढारी वृत्तसेवा – भुसावळ बाजारपेठ परिसरांमधून मोटरसायकल प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये एका गुन्ह्यात बाजारपेठ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 8 मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी भुसावळ उपविभागातील सातत्याने होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतीबंध करण्याबाबत बाजार पेठ पोलिसांना सूचित करण्यात आले होते. तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील संशयीत आरोपी हे चोरीतील मोटर सायकल घेवून न्यु एरीया वाॅर्ड भुसावळ या परिसरात मोटर सायकल चोरी करण्याचे उद्देशाने येणार असल्याचा सुगावा पोलिसांना मिळाला.

या माहीतीच्या आधारे बुधवार (दि.२२) रोजी रात्री सापळा लावून संशयीतास नंबरप्लेट नसलेल्या मोटर सायकलसह ताब्यात घेवून त्याची चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याच्या कब्जात असलेली मोटर सायकल ही चोरीची असल्याचे समोर आले. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती समोर आली असून आरोपी अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्याच्यासोबतच इतर दोन अल्पवयीन साथीदारांसह एकूण 8 मोटर सायकल या भुसावळ, जळगाव व मुक्ताईनगर परिसरातून चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, जावेद शहा, अमर अढाळे, प्रशांत लाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button