बुडालेल्या व्यक्तीस शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यू | पुढारी

बुडालेल्या व्यक्तीस शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यू

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सुगाव बुद्रुक परिसरातील प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या अर्जुन जेडगुले या तरुणाचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या धुळे आपत्ती व्यवस्थापन पथकाची बोट बुडून तीन जवान व स्थानिक तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, तर प्रवरा पात्रात अद्यापही तीन जणाचा शोध प्रशासन घेत आहे.

बुधवारी सागर जेडगुले आणि अर्जुन जेडगुले या दोन तरुणांचा प्रवरा पात्रात आंघोळ करताना पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.त्यातील अर्जुन जेडगुले याचा मृतदेह सापडला नव्हता.त्यामुळे त्याचा मृतदेह शोधण्याकामी धुळे आपत्ती व्यवस्थापन पथक गुरुवारी सकाळी दाखल झाले असता त्याच्या मदतीला स्थानिक ग्रामस्थ गणेश देशमुख धावला.तर अर्जुन जेडगुले याचा मृतदेहा शोध घेत असताना प्रवरा पात्रात सात वाजल्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन पथकांची बोट पाण्याच्या भवऱ्यात अडखळत पलटी होत बुडाली.

या दुर्घटनेत स्थानिक ग्रामस्थ गणेश देशमुख यांच्यासह प्रकाश नामा शिंदे,वैभव सुनील वाघ,राहुल गोपीचंद पावरा हे चार जण बुडाले. यावेळी प्रसंगावधान राखून बाहेर असलेल्या आपत्ती व्यवस्थापन जवानानी तात्काळ पाण्यात उड्या टाकून बेपत्ता जवानांचा शोध घेत पाच जणाना पाण्यातुन वर काढले मात्र प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या तीन जवानांचा मुत्यु झाला आहे. पंकज पवार, अशोक पवार या जवानाला वाचविण्यात यश आले असुन त्यांना अकोल्यातील डॉ. भांडकोळी हाँस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.

तर आपत्ती व्यवस्थापनचा अजून एक जवान ही पाण्यात अडकला असुन तिघे जण पाण्यात असल्याची प्रशासनाकडुन सागण्यात येत आहे. या घटनेची माहिती कळताच माजी महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात, आ.डॉ. किरण लहामटे,खा.सदाशिव लोखंडे, उत्कर्षा रुपवते, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे, अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पो.नि.गुलाबराव पाटील, उपनिरीक्षक भूषण हंडोरे आदींनी भेट देऊन पाहाणी केली. तर सुगाव बु.येथील घटनास्थंळी पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान स्थानिकाच्या मदतीने पाण्यात बुडालेल्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

Back to top button