दक्षिण गोव्यात झोपडीत बस घुसली: ४ मजूर ठार, ४ जण जखमी

दक्षिण गोव्यात झोपडीत बस घुसून  ४ मजूर ठार झाले.
दक्षिण गोव्यात झोपडीत बस घुसून ४ मजूर ठार झाले.

वेर्णा, पुढारी ऑनलाईन: बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत घुसून झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले. त्यांच्यावर मडगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातीत मृत आणि जखमी मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. ही घटना आज (दि.२६) दक्षिण गोव्यातील वेर्णा येथे घडली.

नेमका अपघात कसा घडला?

  • अपघातग्रस्त बस रोझेनबर्गर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती.
  • चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीत घुसली.
  • झोपडीत मजूर झोपले होते. त्यातील ४ जणांचा मृत्यू झाला.
  • अपघातग्रस्त बसचा चालक दारूच्या नशेत होता

याबाबत दक्षिण गोव्याच्या एसपी सुनीता सावंत यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बस रोझेनबर्गर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. यावेळी वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीत घुसली. झोपडीत मजूर झोपले होते. त्यातील ४ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले. त्यांना मडगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसचा चालक दारूच्या नशेत होता, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news