रत्नागिरी: कोकणातील जलपर्यटन ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार | पुढारी

रत्नागिरी: कोकणातील जलपर्यटन ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा: येत्या काही दिवसांच मान्सूनच्या पावसाला सुरूवात होत आहे. त्याचबरोबर खवळलेल्या समुद्रामुळे कोकणातील समुद्री किनाऱ्यावरील जलपर्यटन ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदीचा निर्णय घेतला आहे.

कोकणातील जलपर्यटन या कारणांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

  • येत्या काही दिवसांच मान्सूनच्या पावसाला सुरूवात होत आहे.
  • खवळलेल्या समुद्रामुळे कोकणातील समुद्री किनारे धोकादायक असतात.
  • पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने याबाबत आदेश जारी केले आहेत.

वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची कोकणाला पसंती मिळत असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग अशा साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात येतात. सुट्टया लागल्या की पर्यटकांची पाऊल निसर्गरम्य कोकणाकडे वळतात. वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची कोकणाला पसंती मिळत असते.

मात्र, पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोकणातील जलपर्यंटन आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे, असे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने कळवले आहे.

हेही वाचा 

Back to top button