Varan Bhaat : साध्या वाटणार्‍या वरण-भाताचे ‘हे’ आहेत लाभ… | पुढारी

Varan Bhaat : साध्या वाटणार्‍या वरण-भाताचे ‘हे’ आहेत लाभ...

नवी दिल्ली : वरण-भात हे आरोग्यासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते. अनेक जणांना वरण-भात हे साधे अन्न वाटते; पण हेच साधे अन्न आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. जेव्हा कोणी आजारी किंवा थकलेला असतो तेव्हा आपल्या घरी पटकन वरण-भात केला जातो. कारण तो बनवायला सोपा पदार्थ आहे. सोबत वेळेची बचतही होते. डाळ आणि तांदूळ या दोन्ही खाद्यपदार्थांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. वरण आणि भात खाण्याचे हे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलेले काही लाभ…

अनेकदा लोकांना रात्रीच्या वेळी वरण-भात खाणे आवडते. कारण ते पचायला हलके आणि चवीलाही उत्कृष्ट मानले जाते. डाळ आणि भात एकत्र खाल्ल्यास शरीराला अनेक पोषक द्रव्ये मिळतात. यामध्ये असलेले प्रोटिन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, अँटिऑक्सिडंटस् इत्यादी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. डाळ आणि भात हे संतुलित जेवण मानले जाते. डाळींमध्ये असलेल्या प्रथिने आणि तांदळात असलेल्या कर्बोदकांमधून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि आवश्यक पोषक घटक देखील. वरण आणि भात हे प्रथिनांचे उत्तम स्रोत मानले जातात.

याच्या सेवनाने अत्यावश्यक अमिनो अ‍ॅसिडची कमतरता पूर्ण होते, जे संपूर्ण आरोग्य आणि स्नायूंसाठी फायदेशीर आहेत. डाळ आणि तांदूळ पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असतील, तर रात्रीचे सेवन करणे तुमच्या पोटासाठी खूप चांगले आहे. हे हलके जेवण पोटाची जळजळ, अ‍ॅसिडिटी इत्यादीपासून तुमचे रक्षण करते. वरण-भात बनवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या डाळींचा वापर करू शकता. दाल मखनीपासून ते दाल तडका, हे सर्व पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर पर्याय आहेत. तांदूळ आणि डाळी वजन कमी करण्यासही मदत करतात. यामध्ये असलेले प्रथिने आणि फायबर खाल्ल्यानंतर अस्वास्थ्यकर पदार्थांची लालसा शमवतात. यासोबतच हे चयापचयसुद्धा व्यवस्थित ठेवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Back to top button